मराठी विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते महेश मांजरेकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. महेश मांजरेकरांनी अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली. दरम्यान सध्या महेश मांजरेकर सिनेमाच्या निर्मितीसह दिग्दर्शन सुद्धा करतात. परंतु एकेकाळी महेश मांजरेकर यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. आणि त्यावेळी त्यांनी न घाबरता या मोठ्या आजाराला लढा दिला. त्याच्या पत्नी मेधा मांजरेकर यांनी त्यांच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटबाबत अनेक खुलासे केलेत.