
Marathi Entertainment News : महाराष्ट्रभूषण आणि मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना काल 25 जानेवारीला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. सिनेसृष्टीतील त्यांच्या अनमोल योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करणार येणार असल्याची घोषणा केली. यामुळे मराठी इंडस्ट्रीत सध्या आनंदाचं वातावरण आहे.