Padma Awards 2025: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कला विश्वातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. अशोकमामा यांनी 250 चित्रपटामध्ये काम केलं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. दरम्यान त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.