कानच्या रेड कार्पेटवर झळकला मराठी अभिनेता ! प्रेक्षकांनी केलं कौतुक "आम्हाला तुझा अभिमान वाटतो"

Pushkar Jog At Cannes Film Festival : अभिनेता पुष्कर जोगने कान फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत मराठी इंडस्ट्रीची मान उंचावली. सोशल मीडियावर त्याने फोटो शेअर केले आहेत.
कानच्या रेड कार्पेटवर झळकला मराठी अभिनेता ! प्रेक्षकांनी केलं कौतुक "आम्हाला तुझा अभिमान वाटतो"
Updated on: 

Marathi Entertainment News : संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या कान फिल्म फेस्टिवलला फ्रान्समध्ये सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कलाकारांनी हजेरी लावली आहे. आलिया भट, उर्वशी रौतेला आणि तारा सुतारीया या अभिनेत्रींनी आतापर्यंत रेड कार्पेटवर हजेरी लावली आहे. गेल्या वर्षी छाया कदम यांनी कानचं रेड कार्पेट गाजवलं होतं. या वर्षी कानच्या रेड कार्पेटवर लक्ष वेधून घेतलं ते अभिनेता पुष्कर जोगने.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com