Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा २ मध्ये झळकणार सिद्धार्थ जाधव, चाहत्यांसाठी पर्वणी

Siddharth Jadhav: ‘नवरा माझा नवसाचा २’चे पोस्टर आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत.
Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा २ मध्ये झळकणार सिद्धार्थ जाधव, चाहत्यांसाठी पर्वणी
Navra Maza Navsacha 2sakal

Latest Marathi Movie Update: मराठी चित्रपटप्रेमींचा अत्यंत आवडता चित्रपट ‘नवरा माझा नवसाचा’ २००५मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि सुप्रिया पिळगावकर या दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा २ मध्ये झळकणार सिद्धार्थ जाधव, चाहत्यांसाठी पर्वणी
Navra Mazha Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा 2’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; 'हे' कलाकार साकारणार भूमिका

आजही या चित्रपटातील संवाद, गाणी आणि विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात कोरलेले आहेत. सचिन पिळगावकर यांनी जेव्हा ‘नवरा माझा नवसाचा २’ची घोषणा केली, तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये अभिनेता स्वप्नील जोशी महत्त्वाची भूमिका साकारणार असून, त्याच्यासोबत आणखी एक स्टार कलाकारदेखील असणार आहे. नुकतेच स्वप्नील जोशीने या चित्रपटासाठी डबिंग पूर्ण केले आहे.

त्यामुळे हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे सरकले आहे. स्वप्नील जोशीसह अभिनेता सिद्धार्थ जाधव ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. अलीकडेच सिद्धार्थने सोशल मीडियावर डबिंग पूर्ण झाल्याची बातमी शेअर केली. त्याने ‘नवरा माझा नवसाचा २’चे पोस्टर आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत.

Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा २ मध्ये झळकणार सिद्धार्थ जाधव, चाहत्यांसाठी पर्वणी
Thoda Tuza Thoda Maza: 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत निळू फुलेंच्या लेकीची एण्ट्री; 'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेताही झळकणार

डबिंग पूर्ण झाल्याचे सांगताना सिद्धार्थने या चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचे मत व्यक्त केले आहे. अनेक चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करत, ते त्याच्यापेक्षा अधिक उत्सुक असल्याचे सांगितले. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि अली असगर यांसारखे प्रमुख कलाकार दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हेमल इंगळेने सोशल मीडियावर तिचे डबिंग पूर्ण झाल्याचे जाहीर केले होते. जेव्हा या सिनेमाचे शूटिंग रत्नागिरीमध्ये सुरू होते, तेव्हा काही व्हिडीओही व्हायरल झाले होते. हा चित्रपट २०२४च्या अखेरीस प्रदर्शित होण्याचा अंदाज आहे.

Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा २ मध्ये झळकणार सिद्धार्थ जाधव, चाहत्यांसाठी पर्वणी
Maza Konkan Bhari: निळ्याशार समुंदराची गाज...आमचो कोकण घालतोय तुम्हाला साद; 'घरत गणपती'मधील 'माझं कोकण भारी' गाणं रिलीज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com