
सध्या सोशल मीडिया वापराचं प्रमाण वाढल्याने ठिकठिकाणी मुलांच्या संगोपनाबद्दल बोलणारे पालक दिसतात. आपण जसे दिवस काढले तसे मुलांनी काढू नयेत म्हणून पालक प्रयत्न करत असतात. मात्र त्यांचे अती लाड मुलांच्या कधीकधी मुलांना बिघडवायला कारणीभूत ठरतात. असाच एक प्रसंग लोकप्रिय अभिनेत्री स्वाती देवल हिने एका मुलाखतीत सांगितलाय. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून स्वाती घराघरात पोहोचली. सध्या ती झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' या मालिकेत दिसतेय. तिने दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आहे.