Dashavatar Makers Take Big Decision After Housefull Shows
esakal
मनोरंजन विश्वातील सध्या चर्चेत असलेला सिनेमा म्हणजे 'दशावतार'. या सिनेमाने 9 दिवसात रेकार्डब्रेक कमाई केलेली आहे. 12 सप्टेंबर रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. यानंतर दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं इतकं भरभरुन प्रेम मिळालं की, सगळे शो हाऊलफुल्ल झाले. वयाच्या 81 व्या वर्षी दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली की, त्यांचं सगळीकडे कौतूक झालं.