Masaba Gupta: बधाई हो! नीना गुप्ता होणार आजी; लेक मसाबा गुप्ताने दिली गुडन्यूज

Masaba Gupta: मसाबानं पती सत्यदीप मिश्रासोबतचा (Satyadeep Mishra) फोटो शेअर करुन चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सध्या नेटकरी मसाबा आणि सत्यदीप यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Masaba Gupta and Satyadeep Misra
Masaba Gupta and Satyadeep Misra esakal

Masaba Gupta: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता  (Neena Gupta) या लवकरच आजी होणार आहेत नीना यांची मुलगी आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता (Masaba Gupta) हिने गुडन्यूज दिली आहे. मसाबानं पती सत्यदीप मिश्रासोबतचा (Satyadeep Mishra) फोटो शेअर करुन चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सध्या नेटकरी मसाबा आणि सत्यदीप यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

मसाबा शेअर केली खास पोस्ट

मसाबानं प्रेग्नंट इमोजी पोस्टमध्ये शेअर केला आहे. तसेच तिनं एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आणि सत्यदीप हे दोघे दिसत आहे.या फोटोला मसाबानं कॅप्शन दिलं, "दोन छोटो पाय आमच्याकडे येणार आहेक, कृपया प्रेम, आशीर्वाद आणि केळ्याच्या चिप्स पाठवा (केवळ सॉल्टेड)” मसाबानं शेअर केलेल्या या पोस्टला अनेक सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन सत्यदीप आणि मसाबाला शुभेच्छा दिल्या आहेत.

सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

मलायका आरोरा, कृती सेनन, रिचा चड्ढा, गौहर खान, करिश्मा कपूर या सेलिब्रिटींनी मसाबाच्या पोस्टला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

नीना गुप्ता यांची खास पोस्ट

नीना गुप्ता यांनी देखील लेकीला आणि जावयाला खास पोस्ट शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत. नीना यांनी मसाबा आणि सत्यदीप यांचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "हमारे बच्चों का बच्चा आने वाला है। इससे ज्यादा खुशी की बात क्या हो सकती है"

Masaba Gupta and Satyadeep Misra
Masaba Gupta:'स्विमिंग कॉश्युमवर ओढणी बांधलीय का..', वेडिंग सेलिब्रेशनमधील मसाबाचा ड्रेस लोकांना खटकला..

मसाबा गुप्ताने 2015 मध्ये मधु मंतेनासोबत लग्न केले होते, मात्र लग्नाच्या चार वर्षानंतर मसाबा आणि मधु यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यानंतर 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. गेल्या वर्षी, 27 जानेवारी 2023 रोजी मसाबाने सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. सत्यदीप मिश्राने 2009 मध्ये अदिती राव हैदरीसोबत लग्न केलं. पण 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सत्यदीपनं गेल्या वर्षी मसाबासोबत लग्नगाठ बांधली. मसाबा आणि सत्यदीप यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com