GANESH CHUKKAL ARRESTED
esakal
AKSHAY KUMAR’S SISTER COMPANY POWAI FLAT LEASE DISPUTE: मुंबईतील पवई पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी गणेश चुक्कल यांना अटक केलीय. त्यांच्यासह सहकारी समीर सावंत यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलय. फसवणूक आणि बनावट कागदपत्रांप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याची बहीण अलका भाटिया हिरानंदानी संचालक असलेल्या कंपनीच्या पवईतील फ्लॅटशी संबंधित आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.