Model Jhanvi Kapoor Claims Marriage to Abhishek Bachchan
esakal
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दोघांनी अगदी थाटामाटात लग्न केलं होतं. परंतु काही लग्नात विघ्न येतातच. एश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नात सुद्धा अनेक संकटं आली होती. जान्हवी कपूर नावाच्या महिलेनं अभिषेकसाठी थेट हाताची नस कापून घेतली होती. तसंच अभिषेक बच्चन माझा नवरा असल्याचा दावा ती करत होती. सगळ्यात विचित्र म्हणजे 'अभिषेक बच्चनने माझ्याशी लग्न केलं आहे' असं सुदधा ती बोलत होती.