

mrunal dusanis
esakal
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस सध्या छोटा पडदा गाजवतेय. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. 'तू तिथे मी', 'मन बावरे' या मालिकांमधून ती पुन्हा प्रेक्षकांची आवडती बनली. सध्या मृणाल स्टार प्रवाहवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत दिसतेय. मृणाल जितकी तिच्या मालिकांसाठी ओळखली जाते तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकताच तिच्या चिमुकल्या लेकीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. जो पाहून नेटकरी तिच्या मुलीवर फिदा झालेत.