

Mrunal Thakur Breaks Silence on Valentine’s Day Wedding Rumors With Dhanush
esakal
Bollywood News: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनयामुळे मराठमोळ्या मृणाल ठाकूरने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण ती सध्या चर्चेत आहे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषबरोबर ती रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांचं 14 फेब्रुवारीला लग्न होणार असल्याचंही म्हटलं जात होत. पण व्हॅलेंटाईन डे होऊन गेला तरीही काहीच घडलं नाही आणि या अफवा असल्याचं स्पष्ट झालं.