Mukhesh Khanna On Ranveer Allahbadia Controversy: गेल्या काही दिवसांपासून 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो खूप चर्चेत आहे. प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो खूप चर्चेत आला आहे. आई-वडिलांच्या नात्याबद्दल केलेल्या वाईट कमेंटमुळे लोक खूप संतापले आहे.
महिला आयोगाकडे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या या वक्तव्यावरून देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याबद्दल रणवीरने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत माफी सुद्धा मागितली आहे.