
Bollywood Entertainment News : शक्तिमान फेम मुकेश खन्ना कायमच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. बॉलिवूड कलाकारांविषयी त्यांचं असलेलं मत ते कायमच स्पष्टपणे व्यक्त करतात. काही काळापूर्वीच त्यांनी अभिनेता रणवीर सिंहवर टीका केली होती. तर कॉमेडियन कपिल शर्मावरही संताप व्यक्त केला होता. पुन्हा एकदा त्यांनी कपिल शर्माच्या शोवर टीका केली आहे. कपिलचा शो अश्लील असल्याचं ते म्हणाले.