Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Naach Ga Ghuma: मुक्ता बर्वेनं (Mukta Barve) नुकतीच नाच गं घुमा या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Naach Ga Ghuma
Naach Ga Ghumaesakal

Nach Ga Ghuma: नाच गं घुमा (Naach Ga Ghuma) या चित्रपटाची सध्या चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील गाण्यांचे तसेच या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. नाच गं घुमा या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर अनेकजण थिरकत आहेत. अशातच आता या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या मुक्ता बर्वेनं (Mukta Barve) नुकतीच या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

मुक्ता बर्वेची पोस्ट

मुक्तानं तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सेल्फीला तिनं कॅप्शन दिलं, "तुम्हाला माहित आहे मी आत्ता भारतात नाहीये… कदाचित पहिल्यांदाच असं झालं असेल की माझ्या film च्या release ला मी नाही. त्यामुळे ‘नाच गं घुमा’ रिलीज झाल्यापासून मला ना एक अस्वस्थ feeling येतंय… ते म्हणजे १ मे ला film तर release झाली… आणि आम्ही कलाकृती यासाठीच बनवतो की ती प्रेक्षकांनी बघावी… आणि भरभरून प्रेम द्यावं… आणि… प्रेक्षक सिनेमा बघून कौतुकाने आम्हाला डोक्यावर घेत ही आहेत… पण हे सर्व मी film बघण्या आधीच होतंय..!चित्रपटाचं भरभरून कौतुक होत आहे… प्रेक्षक appreciate करत आहेत, पण मी अजून film पाहिलीच नाहीये… आणि मला त्याची रुख रुख वाटते आहे. पण हरकत नाही… माझ्या नाटकावर माझ प्रेम आहे… तीही माझी commitment आहेत आणि मी इकडे माझ्या @charchaughi नाटकाचे दौरे अगदी उत्साहाने करते आहे… पण मनाने कुठेतरी मी भारतातही आहे माझ्या team सोबत… माझ्या प्रेक्षकांबरोबर… माझ्या मराठी माणसांबरोबर!"

Naach Ga Ghuma
Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

"त्यामुळे आता मी खूप आतुर आहे की कधी मला माझीच film (म्हणजे आपली film) theatre मधे जाऊन तुम्हा सर्वांसोबत बघता येईल! इथले सर्व प्रयोग यशस्वीरीत्या पार पाडून मी लवकरच भारतात येतेय… जी काही कमी राहिली आहे माझ्या अनुपस्थितीममुळे… ती मी भरून काढणार आहे! १२ मे पासून आहेच तुमच्याबरोबर… भेटूया आणि मज्जा करूया,तोपर्यंत थेटरात ‘घुमोत्सव’ असाच उत्साहात साजरा होत राहू दे.", असंही मुक्तानं कॅप्शनमध्ये लिहिलं.

Naach Ga Ghuma
Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com