Murlikant Petkar Arjuna Award: 'चंदू चॅम्पियन चित्रपटामुळे अर्जुन पुरस्कार मिळाला', पेटकरांनी मानले साजिद नाडियादवाला यांचे आभार
Chandu Champion: पेटकर यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास 'चंदू चॅम्पियन'मधून मांडण्यात आला. पेटकर यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये कौशल्य दाखवत पॅरा-स्विमिंगमध्ये सुवर्ण यश मिळवलं. त्यामुळे तब्बल 52 वर्षांनंतर त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
भारताचे पहिले पॅरालम्पिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांच्या संघर्षमय जीवन नाडियादवाला यांनी चंदू चॅम्पियनमधून सर्वासमोर आणलं. पेटकर यांनी देशासाठी बजावलेल्या कामगिरीला तब्बल 52 वर्ष उलटल्यानंतर त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.