

NANA PATEKAR
ESAKAL
आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये दबदबा निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर कायमच त्यांचे विचार बिनधास्तपणे मांडत आले आहेत. नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमादरम्यान नानांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर असं काही विधान केलं की ज्यामुळे सगळेच चकीत झाले. त्यांनी धर्म, जात याबद्दल त्यांचं मत मांडलंय. नागपूरमध्ये झालेल्या जलसंवाद कार्यक्रमात त्यांनी मी आजवर माझी जात कुणालाही सांगितली नसल्याचं म्हटलं.