जणू काळच त्यांच्या तोंडून बोलत होता! उद्या मी असेन नसेन... नाना पाटेकरांचं शेवटचं भाषण अन् ते शब्द खरे ठरले; Video व्हायरल

UDYA MI ASEN NASEN NANA PATEKAR LAST SPEECH VIDEO VIRAL: नाना पाटेकरांच्या निधनाने चाहते शोकसागरात बुडाले असताना त्यांचा शेवटच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात त्यांच्याच तोंडून निघालेले शब्द खरे ठरलेत.
nana patekar LAST SPEECH BECAME REAL

nana patekar LAST SPEECH BECAME REAL

ESAKAL

Updated on: 

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं. राहत्या घरी त्यांना कार्डियाक अरेस्टचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नाना निधनावेळी त्यांच्या गोव्यातील डोना पाउला येथील घरी होते. ४ ऑक्टोबर रोजी त्यांनी तिथल्याच ‘सम्राट क्लब इंटरनॅशनल’च्या पदग्रहण समारंभाला हजेरी लावली होती. या समारंभात त्यांनी भाषणही केलेलं. मात्र तेव्हा कुणाला ठाऊक होतं की नानांच्या तोंडून निघालेले हे शब्द खरे ठरतील. या भाषणादरम्यान “उद्या मी इथे असेन की नाही हे मला माहीत नाही” असं म्हटलं होतं. आता त्यांचं शेवटचं भाषण व्हायरल होतंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com