नाना पाटेकर यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. नाना पटेकर प्रसिद्ध अभिनेता असले तरी ते एक सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगतात. नाना पाटेकर यांना स्वयंपाक बनवण्याची प्रचंड आवड आहे. त्यांच्या हाताचं जेवण अनेक सेलिब्रिटीने खाल्लं आहे. दरम्यान परेश रावल यांनी नाना पाटेकरबद्दल एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.