BJP Politician Navneet Rana’s Garba Dance Goes Viral
esakal
भाजप नेत्या नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. परंतु यावेळी त्या कोणत्या राजकीय वक्तव्यामुळे नाही तर त्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत. त्याचा एका कार्यक्रमातील त्यांनी केलेला गरब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी बॉलिवूडमधील लोकप्रिय गाणं ''जिसे देख मेरा दिल धडका' यावर गरबा खेळलेलं पहायला मिळतय. यावेळी नवनीत राणा यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. नेटकऱ्यांनी त्यांच्या व्हिडिओला पसंती दाखवली आहे.