VIKAS SAMUDRE VIRAL FACEBOOK POST
esakal
VIKAS SAMUDRE CLARIFIES VIRAL POST WAS A TYPING ERROR: मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विकास समुद्रे यांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. दरम्यान अशातच त्यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. विकास समुद्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'मी जीवन संपवत आहे' अशी पोस्ट केली. ही पोस्ट पाहताच चाहत्यांना त्याची काळजी वाटू लागली. दरम्यान या सगळ्यात मुंबई पोलीस दल तात्काळ सतर्क झाले आणि त्यांनी विचारपूस केली.