
Saif Ali Khan Attack Marathi News : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास एका रिक्षामधून लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. रिक्षातून हॉस्पिटलपर्यंत नेताना कुठल्या स्थितीत सैफ अली खान होता? त्याच्याबरोबर कोण कोण होतं? त्यावेळेत नेमकं काय घडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं रिक्षाचालकानं दिली आहेत. साम टीव्हीनं या रिक्षावाल्याशी संवाद साधला.