
Bollywood Entertainment News : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा काल 60 वा वाढदिवस थाटात पार पडला. यानिमित्त आमिरने खास पापाराझींसाठी पार्टी आयोजित केली होती. गुरुवारी संध्याकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात त्याने त्याच्या नवीन गर्लफ्रेंडची ओळख सगळ्यांना करून दिली. आमिर पुन्हा प्रेमात पडला असून त्याच्या नवीन गर्लफ्रेंडचं नाव गौरी स्प्रॅट असं आहे. गेली 25 वर्षं ते एकमेकांना ओळखतात आणि गेल्या दीड वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत.