चित्रपट निर्माते प्रीतिश नंदी यांचं काल निधन झाले आहे. या बातमीनंतर बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक बॉलीवूड कलाकार त्यांच्या श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अनेक जण प्रीतिश नंदी यांच्यासोबतच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच 'बधाई हो'मधील अभिनेत्री निना गुप्ता यांनी प्रीतिश नंदी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास नकार दिला आहे. निना गुप्ता यांची 'NO RIP' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.