
Bollywood News : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती मेट गाला 2025 ची. फॅशनची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील सेलिब्रिटी त्या वर्षीच्या थीमनुसार आऊटफिट घालत फॅशनमधील कल्पकता आणि श्रीमंतीचे प्रदर्शन करतात. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड कलाकारांनाही या शोच्या व्यासपीठावर स्थान मिळू लागलं आहे.