Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Nora Fatehi Car Accident: सनबर्न फेस्टिव्हलला जात असताना झाला अपघात; रूग्णालयात डॉक्टरांनी सीटी स्कॅनही केले
Nora Fatehi

Nora Fatehi

esakal

Updated on

Bollywood actress Nora Fatehi suffers a head injury in a road accident: प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही हिचा आज (शनिवार) मुंबईत अपघात झाला. डेव्हिड गुएटाच्या कॉन्सर्ट संगीत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती सनबर्न फेस्टिव्हलला जात होती. दरम्यान, तिच्या कारला अपघात झाला, ज्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली.

प्राप्त माहितीनुसार, नोरा फतेही सनबर्न फेस्टिव्हलला जात असताना, एका मद्यधुंद कार चालकाने तिच्या कारला जोरदार धडक दिली आणि यामुळे ती जखमी झाली. अपघातानंतर, नोराच्या टीमने तिला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे तिचे सीटी स्कॅन करण्यात आले.

डॉक्टरांनी तपासणी आणि उपाचर केल्यानंतर, नोरा फतेही हिला सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, परंतु नोराने कामावर परतण्याचा आग्रह धरला आणि ती सनबर्न २०२५ मध्ये तिच्या सादरीकरणासाठी निघूनही गेली.

Nora Fatehi
Sanjay Khodke Accident : राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा अपघात; पक्षाच्या बैठकीला दुचाकीने जात असताना कारने दिली धडक!

अपघातानंतर नोराला रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा रक्तस्त्राव झाल्याचे लक्षात आल्याने, डॉक्टरांनी तिला अंतर्गत दुखापत झाली आहे का हे निश्चित करण्यासाठी सीटी स्कॅन केले. सीटी स्कॅननंतर, डॉक्टरांनी पुष्टी केली की तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, ज्यामुळे अभिनेत्रीने तिचा नियोजित कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com