

Actor Admits Firing Gun In Oshiwara Incident
Esakal
ओशिवरा इथं गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल आर खान याला अटक करण्यात आलीय. १८ जानेवारीला मुंबईत ओशिवारा, अधेरी इथं एका रहिवाशी इमारतीच्या दिशेनं चार गोळ्या झाडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शुक्रवारी अभिनेता कमाल खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. चौकशीत त्याने गोळीबार आपणच केल्याचं कबूल केलंय. मात्र बंदूकीचा परवाना असल्याचा दावा केलाय. आता पोलीस त्याच्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत.