OTT Releases This Week: वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

OTT Releases This Week: ओटीटीवर काही चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही वीकेंडला घरबसल्या पाहू शकणार आहात.
OTT Releases This Week
OTT Releases This Weekott

OTT Releases This Week: ओटीटीवर विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. हा वीकेंड सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे. कारण या वीकेंडला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. ओटीटीवर काही चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही वीकेंडला घरबसल्या पाहू शकणार आहात.

सायलेन्स 2

अभिनेते मनोज बाजपेयी हे वेब सिरीज आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. फॅमिली मॅन या वेब सीरिजमुळे मनोज यांना विशेष लोकप्रियता मिळाली. आता मनोज यांची सायलेन्स 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा चित्रपट तुम्ही वीकेंडला पाहू शकता.

रिलीज डेट-16 एप्रिल

ओटीटी प्लॅटफॉर्म- झी-5

कथानक- हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे, ज्यामध्ये मनोजने एसीपी अविनाशची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री प्राची देसाईनं देखील काम केलं आहे.

आर्टिकल 370

यामी गौतमच्या आर्टिकल 370 या चित्रपटानं थिएटरमध्ये धुमाकूळ घातला. या चित्रपटात  प्रियमणी, किरण करमरकर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आदित्य सुहास जांभळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे.

रिलीज डेट: 19 एप्रिल

ओटीटी प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स

रिबेल मून - पार्ट 2: द स्कारगिव्हर

रिलीज डेट: 19 एप्रिल

ओटीटी प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स

रिबेल मून: द स्कारगिव्हर हा झॅक स्नायडरच्या स्पेस ॲडव्हेंचर फिल्मचा दुसरा भाग आहे.

OTT Releases This Week
Chhava: विकी कौशलच्या 'छावा'चित्रपटात मराठमोळ्या कलाकारांची वर्णी; सेटवरील फोटो व्हायरल

चीफ डिटेक्टिव्ह 1958

रिलीज डेट: 19 एप्रिल

ओटीटी प्लॅटफॉर्म: जिओ सिनेमा

चीफ डिटेक्टिव्ह 1958 ही एक कोरियन वेब सीरिज आहे, ज्यामध्ये रेट्रो क्राईम तपासणी दाखवण्यात आली आहे.

OTT Releases This Week
Albattya Galbattya: 'हा' अभिनेता पुन्हा एकदा साकारणार चिंची चेटकीण, सिनेमाच्या टीझरनं जिंकली मनं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com