'पंचायत' या लोकप्रिय वेब सिरीजचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. 24 जून रोजी फुलेरा गावची राजकीय रणधुमाळी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. नुकताच या सिरीजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला असून, यामध्ये मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यातील निवडणूक लढतीचं धमाकेदार अंदाज प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला आहे.