POOJA SAWANT
esakal
POOJA SAWANT SINDHUDURG VILLAGE LIFE: अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे दैनदिन अपडेट देत असते. अशातच आता पूजा सावंतने गावाकडचे व्हिडिओ इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेत. पुजा नेहमीच तिच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून कोकणात जात असते. अशातच तिने कोकणातील तिच्या घराचा तसंच आमराईचा व्हिडिओ शेअर केलाय.