

Salman Khan weight loss, lean fitness transformation
ESAKAL
बॉलिवूडचा लाडका भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. त्याला पाहण्यासाठी चाहते दिवसरात्र त्याच्या गॅलेक्सी अपरमेन्टच्या बाहेर उभे राहतात. त्याचा वाढदिवस म्हणजे तर चाहत्यांसाठी एखादया सणासारखा असतो. त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. काही दिवसांपूर्वी सलमानचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला ज्यात त्याचं वजन प्रचंड कमी झालेलं दिसलं. त्याला पाहून चाहते चकीत झालेले. त्याला कोणता आजार झालाय का असा प्रश्नही विचारण्यात येत होता. आता मात्र सलमानने स्वतः त्यामागचं कारण सांगितलं आहे.