ARMAAN MALIK HOSPITALISED
esakal
Armaan Malik Health Update: प्रसिद्ध संगीतकार, गायक अरमान मलिक हा तरुणांमधील सर्वात लोकप्रिय कलाकार आहे. अरिजीत सिंगनंतर सगळ्यात जास्त कोणाचा चाहता वर्ग असेल तर तो 'अरमान मलिकचा' आहे. दरम्यान अशातच अरमान मलिकच्या चाहत्यांसाठी काळजीत टाकणारी बातमी समोर आलीय. अरमानच्या अचानक प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्याचे सोशल मीडियावर रुग्णालयातील फोटो व्हायरल होताय.