

prajakta mali on cm fadnavis
esakal
CM Devendra Fadnavis: मराठीतली आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून कधीही चुकीचा शब्द पडत नाही, भलेही त्यांच्यावर कितीही चिखलफेक झाली तरी ते संयमाने बोलत असतात, असं प्राजक्ता माळी म्हणाली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या महिला नेत्याने प्राजक्ताला सणसणीत टोमणा मारलाय.