

bigg boss marathi 6 voting trend
esakal
'बिग बॉस मराठी ६' नुकतंच सुरू झालंय. या सीझनमध्ये प्रेक्षकांची आवडती गायिका प्राजक्ता शुक्रे देखील आहे. प्राजक्ता पहिल्याच आठवड्याची कॅप्टन बनली. तिच्या गोड गळ्याचे लाखो चाहते आहेत. ती आणि लोकप्रिय गायक अभिजीत सावंत चांगले मित्र आहेत. ते दोघे 'इंडियन आयडल'च्या पहिल्या सीझनमध्ये एकत्र होते. मात्र त्यांचा सिझन संपल्यावर अशी एक घटना घडली ज्याने सगळेच हादरून गेले होते. प्राजक्ताच्या शुक्रेच्या हातून घडलेला तो अपघात हा त्यांची आयुष्य बदलायला कारणीभूत ठरलेला.