Dhananjay Powar Defends Pranit More After Hindi Contestants Mock Him
esakal
बिग बॉस हिंदीच्या 19व्या पर्वात स्पर्धेकांचे वेगवेगळे रुप पहायला मिळताय. यामध्ये शोमध्ये दिवसेंदिवस ट्वीस्ट येताना पहायला मिळत आहे. यात मराठमोळा स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरे सुद्धा सहभागी झालाय. सगळेच मराठी लोक प्रणितला पाठिंबा देताना दिसत आहे. या शोमध्ये आपल्या विनोदी स्वभावाने प्रणितने सर्वांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याने प्रणित लक्ष केलय. कलर्स टीव्हीने बिग बॉसचा नवीन प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये अमाल मलिकने त्याची खिल्ली उडवली. त्यानंतर धनंजय पोवारने संताप व्यक्त केलाय.