Prathamesh Parab: प्रथमेशचा 'लग्नवाला प्यार' आणि क्षितिजाचं खास मंगळसूत्र; प्रतिजाच्या लग्न सोहळ्याचा खास व्हिडीओ व्हायरल

नुकताच प्रथमेश आणि क्षितिजाने त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. सगळीकडे त्यांच्या या व्हिडीओची चर्चा होतेय.
Prathamesh Parab
Prathamesh Parabesakal

Prathamesh Parab: अभिनेता प्रथमेश परबने (Prathamesh Parab) फेब्रुवारी महिन्यात क्षितिजा घोसाळकरसोबत (Kshitija Ghosalkar) लग्नगाठ बांधली. प्रथमेश आणि क्षितिजाच्या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. नुकताच प्रथमेश आणि क्षितिजाने त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. सगळीकडे त्यांच्या या व्हिडीओची चर्चा होतेय.

प्रथमेश आणि क्षितीजाच्या लग्नाची तयारी, हॉलवरची गडबड, त्यांचे मजेदार क्षण, प्रथमेश आणि क्षितिजा यांच्या प्रेमाचा प्रवास या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो आहे. त्या दोघांच्या लग्नात त्यांच्या मित्र-मंडळींनी केलेली धमाल, लग्नासाठी तयार होताना प्रथमेशची होणारी चिडचिड, मंगलाष्टका सुरु असताना क्षितिजाला चोरून बघणं हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असून त्याच्या चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप पसंत पडलाय. प्रथमेशने त्याच्या आणि क्षितीजाच्या रिलेशनविषयी सुरुवातीला घरी काहीही सांगितलं नव्हतं पण मला त्याचा अंदाज इंस्टाग्राम पोस्टमुळे आला होता असं प्रथमेशचा धाकटा भाऊ या व्हिडिओमध्ये सांगतो. प्रथमेशने त्याच्या भावाला "मला क्षितिजासोबत लग्नवाला प्यार झालंय आणि मी तिच्यासोबतच लग्न करणार" हे सांगितल्याचंही त्याने रिव्हील केलं. क्षितीजाच्या गळ्यातील इन्फीनाईट चिन्ह असलेल्या मंगळसूत्रानेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

प्रथमेश आणि क्षितीजाच्या या लग्नाच्या व्हिडिओला "आमच्या प्रेमाची सुरुवात ते त्याचा शेवट गोड होईपर्यंत..." असं कॅप्शन दिलं आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत त्यांना या दोघांची जोडी आवडल्याचं म्हंटलं. तर अनेकांनी प्रथमेश आणि क्षितिजाचं अभिनंदनसुद्धा केलं आहे.

पाहा व्हिडीओ:

Prathamesh Parab
Prathamesh Parab: प्रथमेशच्या बायकोचा खास उखाणा; क्षितिजानं शेअर केला व्हिडीओ

इंस्टाग्राममुळे क्षितिजा आणि प्रथमेशची ओळख झाली. क्षितिजाने केलेलं एक फोटोशूट प्रथमेशला आवडलं आणि त्याने तिला मेसेज करून तिचं कौतुक केलं. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. क्षितिजा ही नोकरी करत असून तिला मॉडेलिंगचीही आवड आहे. सोशल मीडियावर ती वेगवेगळ्या थीमवर आधारित फोटोशूट शेअर करत असते. प्रथमेश-क्षितिजाने काही महिन्यांपूर्वी त्यांचं एकत्र फोटोशूट शेअर केलं होतं आणि तेव्हापासूनच त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com