Preity Zinta: सहा वर्षानंतर प्रिती झिंटाचं बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमबॅक; 'या' चित्रपटात करणार काम

Preity Zinta: उत्तम व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिती बऱ्याच काळाने बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. त्यामुळे प्रितीच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
Preity Zinta
Preity Zintaesakal

Preity Zinta: 90 आणि 2000 चं दशक आपल्या अभिनयाने गाजवणारी एक अभिनेत्री म्हणजे प्रिती झिंटा (Preity Zinta). दमदार अभिनय आणि तितकंच उत्तम व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिती बऱ्याच काळाने बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय.

लाहोर 1947 मधून प्रिती करतीये कमबॅक

लाहोर 1947 या सिनेमात ती काम करत असून नुकतंच सिनेमाच्या सेटवरील फोटोज तिने शेअर केले. या फोटोमध्ये प्रिती तिच्या सिनेमातील टीमसोबत दिसत असून या फोटोंना तिने 'लाहोर 1947च्या सेटवर' असं कॅप्शन दिलं आहे. सेटवर फोनच्या वापराला मनाई आहे, हे तिने शेअर केलेल्या फोटोमधून समजतंय. या सिनेमातील तिचा लूक अजून तिने रिव्हील केला नाहीये.

लाहोर 1947 या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. राजकुमार संतोषी हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा सिनेमा 1947 साली झालेल्या फाळणीवर आधारित असून प्रितीची या सिनेमात काय भूमिका असणार हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. या सिनेमात आणखी कोण कलाकार असणार हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये.

Preity Zinta
Preity Zinta Birthday : सलमान, राणी मुखर्जी घाबरले, ती एकटीच अंडरवर्ल्ड डॉनला नडली! त्यानंतर कधीच...

प्रितीनं केलंय 'या' चित्रपटात केलंय काम

2018 साली आलेल्या 'वेलकम टू न्यूयॉर्क', 'भैय्याजी सुपरहिट' या सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्यानंतर बराच काळ ती सिनेविश्वापासून दूर होती.तर शेवटचा तिचा झूम बराबर झूम हा सिनेमा गाजला होता. त्यानंतर प्रीतीने बऱ्याच कमी सिनेमांमध्ये काम केलं. ती परदेशात काही काळासाठी स्थायिक झाली पण सुरुवातीच्या काळात तिचे अनेक सिनेमे गाजले. दिल से, सोल्जर, क्या कहना, वीर झारा, चोरी चोरी चुपके चुपके, मिशन काश्मीर, दिल चाहता है हे तिचे सिनेमे खूप गाजले. 'वीर झारा' सिनेमातील तिची शाहरुख खान सोबतची केमिस्ट्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे तर तिच्या कल हो ना हो या सिनेमाचंही खूप कौतुक झालं होतं.

प्रितीने 2016 साली जीन गुडइनफशी लग्न केलं. तिने सरोगसीच्या मदतीने दोन मुलांना जन्म दिला. ती सध्या लॉस एंजेलीसमध्ये तिच्या कुटुंबासोबत राहते. या शिवाय प्रीती किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमची मालक सुद्धा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com