
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात. या मालिकांमध्ये येणारे ट्विस्ट आणि टर्न प्रेक्षकांना मालिकेमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी पुरेसे ठरतात. मात्र कधीकधी मालिकांच्या भरकटत जाणाऱ्या कथेचा प्रेक्षकांना कंटाळा येतो. तर कधी कधी खऱ्या आयुष्यात न घडणाऱ्या आणि अगदीच असंबद्ध गोष्टी मालिकांमध्ये दाखवल्या जातात. मात्र प्रेक्षकही या चुका पटकन पकडतात. स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील अशीच एक चूक प्रेक्षकांनी पकडलीये. लेखक प्रेक्षकांना वेडे समजतात का असा प्रश्न आता नेटकरी विचारत आहेत.