

Asambhav Marathi Movie Trailer
esakal
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत रहस्य आणि थराराचा नवा अध्याय लिहिणारा ‘असंभव’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. सचित पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरनंतर निर्माण झालेलं कुतूहल या ट्रेलरने आणखीनच वाढवलं आहे.