

Priyanka Chopra On Varanasi
esakal
Entertainment News : ग्लोब ट्रॉटर इव्हेंटच्या प्रचंड यशाने खरोखरच चर्चा रंगवली आहे. या इव्हेंटमध्ये एस. एस. राजामौली यांच्या पुढील मेगा फिल्म वाराणसीचा दमदार टीझर आणि टायटल प्रदर्शित करण्यात आला. ज्यात महेश बाबू मुख्य भूमिकेत आहेत. हे आतापर्यंतच्या भारतातील सर्वात मोठ्या घोषणांपैकी एक ठरले असून, याने आधीची सर्व उत्सुकता मागे टाकली आहे. या इव्हेंटला मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते, तसेच महेश बाबू, प्रियंका चोप्रा जोनस आणि पृथ्वीराज सुकुमारन यांसारखे मोठे कलाकारही उपस्थित होते.