अल्लू अर्जुन, आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला खूप पसंती मिळाली. या चित्रपटाने भारतातील सिनेमागृहात धमाकेदार कामगिरी केली होती. अल्लू अर्जुनची दमदार अॅक्टिंग, खतरनाक डायलॉग आणि जबदरस्त अॅक्शन यामुळे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाने 350 कोटींचा गल्ला जमा केला. त्यानंतर 2024 मध्ये पुष्पा 2 ने देखील धमाकेदार कामगिरी केली. चित्रपटाने एका आठवड्यातच 500 कोटींचा गल्ला कमावला. दरम्यान आता पुष्पा 3 संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.