
Latest News : टुरिझम न्यूझीलंडने सुप्रसिद्ध कलाकार तसेच वास्तव आयुष्यातील पती-पत्नी राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा समावेश असलेल्या आपल्या #BeyondTheFilter या नवीन अभियानाचे आज उद्घाटन केले. आओटिआरोआ न्यूझीलंडच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या अस्पर्श सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी #BeyondTheFilter अभियान भारतीय पर्यटकांना आमंत्रित करत आहे. केवळ सुट्टी घालवणे नव्हे तर संपूर्णत्वाची, पुनरुज्जीवनाची व शोधाची भावना हवी असलेल्या भारतीय पर्यटकांना हे आमंत्रण आहे.