

voice of ravana
esakal
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण' या चित्रपटाने सगळ्यानप्रेमात पाडलंय. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे, यश यांसारखे कलाकार आहेत. कलाकारांच्या अभिनयासोबतच चित्रपटातील व्हीएफएक्स, संवाद, दृश्य यासगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलीये. एक अविस्मरणीय अनुभव घेऊन प्रेक्षक थिएटरमधून बाहेर पडतात. खासकरून कलाकारांचे संवाद प्रेक्षकांच्या मनात घर करतात. त्यातच दाक्षिणात्य अभिनेता यशने रावण प्रचंड चांगला रंगवला आहे. त्याच्या भारदस्त आवाजाचंदेखील कौतुक होतंय. मात्र तो यशचा खरा आवाज नाहीये. त्याच्या बोलण्यात कन्नड भाषेची छबी असल्याने एका मराठी अभिनेत्याने त्याला डब केलंय. कोण आहे हा अभिनेता?