दिग्दर्शक आदित्य धारबरोबर रणवीरने सुवर्णमंदिरात घेतलं दर्शन ; 'या' बिग बजेट प्रोजेक्टच्या शूटिंगला होणार सुरुवात

Ranveer Singh Started New Project After Daughter's Birth : अभिनेता रणवीर सिंहने मुलीच्या जन्मानंतर घेतलेला ब्रेक संपवत नव्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घेऊया त्याच्या या अपकमिंग बिग बजेट सिनेमाविषयी.
Ranveer Singh Post
Ranveer Singh Postesakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेता रणवीर सिंह सिंघम अगेन सिनेमामुळे चर्चेत राहिला. सिनेमात पाहुणा कलाकार असला तरीही त्याचा संपूर्ण सिनेमातील अपिरिअन्स गाजला. अनेकांनी रणवीरच्या अभिनयाचं कौतुक केलं. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यात त्याची मुलगी दुआचा जन्म झाला. त्यामुळे काही काळ त्याने अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता या छोट्याशा ब्रेकनंतर रणवीर पुन्हा एकदा नव्या सिनेमाच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com