

raveena tandon
esakal
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन हिने नुकतीच सोनी मराठीच्या 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात हजेरी लावली. यात तिने बॉलिवूडमधल्या कलाकारांसोबत काम करण्यापासून ते तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांबद्दल बऱ्याच गप्पा मारल्या. याच गप्पांमध्ये रवीनाने आपण मांसाहार करत नसल्याचं सांगितलं. सुरुवातीला आपण नॉनव्हेज खायचो मात्र नंतर मुलीमुळे आपण ते बंद केल्याचं सांगितलं. तिने मुलीबद्दलचा तो भावनिक प्रसंग सांगितला ज्यामुळे तिने नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद केलं.