५० हजार लोक, घोड्यावर बसलेली रेखा खाली कोसळली! अख्खा स्टेडियम चिडीचूप, दिग्दर्शकाने ३५ वर्षांनी सांगितला किस्सा

Rekha Phool Bane Angaray Movie Shooting Incident: १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फूल बने अंगारे' या चित्रपटाच्या सेटवर घडलेला हा थरारक प्रसंग आता तब्बल ३५ वर्षांनंतर समोर आला आहे.
rekha fell from horse

rekha fell from horse

esakal

Updated on: 

रजनीकांत आणि रेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'फूल बने अंगारे' या चित्रपटाने १९९१ मध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटात रेखा यांनी साकारलेली महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पत्नीने धारण केलेलं रौद्ररूप पाहून चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता. के. सी. बोकाडिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी तब्बल ६ कोटी रुपयांची कमाई केली होती. विशेष म्हणजे, चित्रपटाचं बजेट २.१५ कोटी रुपये होतं. आता बोकाडिया यांनी नुकताच रेखा यांचा एक किस्सा सांगितला आहे जेव्हा शुटिंगवेळी त्या खाली पडलेल्या.

Loading content, please wait...