रितेश आणि जेनिलिया यांची जोडी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अनेकजण त्यांच्या जोडीचे चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जेनिलिया नेहमीच रितेशबाबतच प्रेम व्यक्त करत असते. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नेहमी ते मजेशीर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. अशातच आता जेनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रितेश आणि जेनिलियाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.