रोहित शेट्टी आणि शाहरुख खान यांची सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख आहे. 2013 मध्ये रोहित शेट्टीचा चित्रपट 'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये शाहरुख खानने काम केलं होतं. हा चित्रपट प्रचंड गाजला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रेम दिलं. यानंतर रोहित शेट्टीच्या 'दिलवाले'मध्ये शाहरुखने काम केलं. परंतु हा चित्रपट हवा तसा गाजला नाही. त्यामुळे या चित्रपटानंतर रोहित आणि शाहरुख यांनी कधीच एकत्र काम नाही केलं. दोघांमधील भांडणांच कारण फक्त तो फ्लॉप चित्रपट असल्याचं बोललं जातं.