ROOPA GANGULY
esakal
ROOPA GANGULY 60TH BIRTHDAY SPECIAL UNKNOWN FACTS ABOUT HER LIFE: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुपा गांगुली यांचा मोठा चाहतावर्ग आहे. बी. आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' या मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारून त्या घराघरात पोहोचल्या. त्यांच्या अभिनयाने या भूमिकेला वेगळीच ओळख मिळवून दिली. अभिनयासह त्यांनी पार्श्वगायन आणि राजकारण क्षेत्रातही मोठी कामगिरी केली. दरम्यान आज त्यांचा ६० वा वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्या आयुष्यातील आणि 'महाभारत' मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा एक खास किस्सा जाणून घेऊया.