
Entertainment News : अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कुरळे ब्रदर्सची धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांच्या जोडीला सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक आणि संजय नार्वेकर यांच्याही प्रमुख भूमिका यात आहेत. चित्रपटाच्या यशस्वी समारोपानंतर कलाकार आणि निर्मात्यांनी या चित्रपटाविषयीचा आपला उत्साह व्यक्त केला.